Marathi News

आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणेने साकारली रूपाली थोरात – पोश्टर गर्ल सोनाली

AAP_1846

 

सिनेमा म्हटला की तयारी आलीच…दिग्दर्शकापासून ते लेखकापर्यंत…निर्मात्यांपासून ते टेक्नीशिअन्सपर्यंत सगळेच आपले काम उत्तम व्हावे यासाठी धडपडत असतात…तर आपली भूमिका उत्तम पार पडावी यासाठी कलाकारही खास कष्ट करताना आपल्याला दिसतात.

 

12 फेब्रुवारीला येऊ घातलेल्या वायकॉम18 मोशन पिक्चर्स आणि चलो फिल्म बनायें यांच्या ‘पोश्टर गर्ल’ सिनेमासाठी सोनालीनेही बरीच मेहनत घेतली आहे.

 

‘हात खाली, नजर खाली….फक्त नाव लक्षात ठेवायचं…”रूपाली”, म्हणत अख्या गावाला इंगा दाखवणारी ही ‘रूपाली थोरात’, आपल्या बिनधास्त आणि बेधडक अंदाजाने गावातल्या पुरूषांच्या नाकी – नऊ आणते…

 

पोश्टर गर्लमधल्या रूपालीच्या भूमिकेविषयी बोलताना सोनाली म्हणते, की या भूमिकेसाठी तिने आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. ज्यापध्दतीने त्यांनी एका छोट्या शहरातून आपली कारकीर्द सुरू करून आज एक उंची गाठली आहे, तशीच काही स्वप्न रूपालीचीही आहेत. एका छोट्या शहरातून आलेल्या रूपालीला खूप मोठे व्हायचे आहे. समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द तिच्यात आहे.’ शिवाय आयपीएस पाटील एका उंचीवर असूनही ते ज्यापध्दतीने आपल्या मातीशी जोडलेले आहेत, हे नक्कीच कौतुकास्पद असल्याचेही सोनाली म्हणाली.

 

सोनालीने साकारलेली ही रूपाली थोरात आपल्या भेटीला येणार आहे….12 फेब्रुवारीला तुमच्या नजीकच्या चित्रपटगृहात….

Related Articles

Leave a Reply

Back to top button