Marathi News

‘अशी ही आशिकी’ नंतर अभिनय खरंच करतोय का हेमलला डेट?

अभिनय-हेमलला
‘अशी ही आशिकी’ या सिनेमात दिसणारी हेमल आणि अभिनय या जोडीमधील केमिस्ट्री आता ऑफ स्क्रिनवर पण दिसतेय. मराठी सिनेसृष्टीतील हे नवीन लव्ह बर्ड्स आहेत का असे बोलले जातेय. इतकेच नव्हे तर या सिनेमातील स्वयम आणि अमरजा या ऑन स्क्रिन जोडीची भूमिका साकाराणारे अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे रिअल लाईफमध्ये एकमेकांना डेट तर करत नाहीएत ना… असा प्रश्न अनेकांच्या मनात नक्कीच आला असेल. कारण ही नवीन जोडी प्रमोशनच्या दरम्यान जरा जास्तच एकत्र रुळली, त्यांच्या हावभावातून ते पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेस असं कुठेही जाणवत नाही.
तसेच प्रमोशन दरम्यान अभिनय आणि हेमलमध्ये तयार झालेली जवळीक यामुळे आणि त्यांचे काही फोटोस् व्हायरल झाल्यामुळे ते डेट करत आहेत अशी चर्चा रंगत आहे. पण सध्या दोघेही या विषयावर काही बोलू इच्छित नसल्यामुळे खरं काय ते अजून कळलेलं नाही.
पडद्यावरील त्यांची केमिस्ट्री ही उत्तम जुळली आहे आणि त्यांची आशिकी पाहिल्यावर प्रत्येकजण म्हणेल की वेड्यासारखं आणि मनापासून प्रेम करणारी ‘अशी ही आशिकी’. ख-या आयुष्यात खरंच ते दोघं एकमेकांसोबत आशिकी करण्याच्या बेतात आहे की नाही हे अजून तरी कळले नाही. पण सुंदर आशिकी अनुभवयाची असेल तर १ मार्चला स्वयम आणि अमरजाची ‘अशी ही आशिकी’ सिनेमागृहात नक्की पाहा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button