Marathi Trends
अभिनेत्री रीना अग्रवालची मलेशिया सफर
सिनेकलाकारांना बिझी अश्या शूटिंगच्या वेळापत्रकातून वेळ मिळत नाही. रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विसावा हवा असतो,परंतू थोडीशी जरी उसंत मिळाली तर कलाकार काही ना काही कलांना वाव देत त्यांचे छंद जोपासत असतात.. अभिनेत्री रीनानेसुद्धा आगामी चित्रपट ‘देव देव्हाऱ्यात नाही’ या चित्रीकरणातून जरा उसंत काढत, आपला पर्यटनाचा छंद जोपासला. त्यासाठी तिने मलेशियातील मुक्काम पोस्ट लंकावी आणि कोलालंप्पूर गाठलं.
लंकावीमध्ये पहिल्यांदाच स्नोर्केलिंग आणि अंडर वाॅटर वर्ल्ड सफारीची मज्जा रीनाने लुटली.. आता परदेशी जाणार म्हणजे खवय्येगिरी तर होणारच! तिथे रीनाने चिकन साते आणि नासी लेमाक या मलेशियातील सुप्रसिद्ध असणाऱ्या पदार्थांचा आस्वाद घेतला..
बाटू केव्हमधली हिंदू मंदिर अतिशय अविस्मरणीय स्थळ आहे, असे रीना सांगते. तुमचा देखील मलेशियात भटकंतीसाठी जाण्याचा प्लॅन असेल तर, रीनाने पर्यटकांसाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. ती सांगते, ‘जर तुम्ही लंकावीमध्ये फिरण्यासाठी जात असाल तर लोकल टॅक्सीऐवजी उबेर बुक करू शकता. प्रवास करण्यासाठी ते जास्त सोयीस्कर पडेल. तसेच कोलालंप्पूरमध्ये ज्या लोकल बसेस आहेत त्याचा पुरेपूर प्रवास करण्यासाठी उपयोग करावा.