हर्षदा खानविलकरच्या बिग बॉसमध्ये झालेल्या धमाकेदार एन्ट्रीला मिळतोय प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद
अभिनेत्री हर्षदा खानविलकरने आक्कासाहेब बनून टेलिव्हिजन विश्वात अधिराज्य गाजवल्यावर आता त्यांची बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच त्यांची धमाकेदार एन्ट्री बिग बॉसच्या घरात झाली आहे.
मराठी टेलिव्हिजन आणि फिल्म इंडस्ट्रीत हर्षदा स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. आणि बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच आपल्या रोखठोक सवाल-जवाबाने पून्हा एकदा हर्षदा खानविलकरने रसिकांची मनं जिंकली.
बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्याअगोदर सकाळी हर्षदा खानविलकरचा इन्स्टाग्रामवर डेब्यु झाला होता. इन्स्टाग्रामवर येताच 24 तासाच्या आत हर्षदाच्या फॉलोवर्सची संख्या तीन हजाराच्यावर गेली. सूत्रांच्या अनुसार, हर्षदा खानविलकर ही पहिली मराठी अभिनेत्री आहे, जिचे 24 तासात एवढे जास्त फॉलोवर्स झाले. हर्षदाची जनमानसात असलेली ही प्रसिध्दी माहित असल्यामुळेच इन्डमॉल शाइनने त्यांची बिग बॉसमध्ये एन्ट्री करायचे ठरवले.
सूत्रांच्या मते, बिग बॉसच्या घरात काही दिवसांपासून चालू असलेल्या त्याच-त्याच वादाचा परिणाम बिगबॉसच्या घसरत्या टीआरपीवरही होत होता. त्यामुळेच आक्कासाहेब बनून सहा वर्ष मालिकेचा टीआरपी चढता ठेवण्याएवढी लोकप्रियता असणा-या हर्षदा खानविलकरची एन्ट्री बिगबॉसमध्ये झाली. आणि हर्षदाच्या इन्स्टा अकाउंटवर प्रेक्षकांच्या येणा-या प्रतिक्रियांमूळे इंडमॉलची ही स्ट्रॅटेजी कामी आल्याची गोष्ट अधोरेखित होत आहे.