स्वप्नीलचे एस. जे. कलेक्शन चाहत्यांसाठी खुले

swwapnil-joshi-collection-cloths-max-showroom

बदलते लूक आणि आपल्या स्टाईल स्टेटमेंटने आजच्या तरुणाईला भुरळ घालणारे अनेक बॉलीवूड स्टार  आपण पहिले असतील. आपल्या या हटके फॅॅशनचे कलेक्शन चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचा फंडा हिंदीतील कित्येक सेलिब्रिटींनी यापूर्वी राबवला आहे.  हाच फंडा आता मराठी इंडस्ट्रीतही येऊ घातला आहे. आपल्या चाहत्यांची ही क्रेज लक्षात घेऊन प्रथमच एका मराठी स्टारचे कलेक्शन बाजारात दाखल झाले आहे.  फॅॅशन हॉलिक असणा-या आजच्या तरुणाईचा लाडका मराठी अभिनेता स्वप्निल जोशी याचे नुकतेच मालाड येथील इन्फीनिटी मॉलच्या मॅक्स स्टोअरमध्ये स्वप्निल रेकमेंड्स ‘लूक बुक’ लॉजसह  सादर करण्यात आले. स्वप्नीलचा स्टायलिश्ट लूक आणि त्याने रेकमेंड केलेले  कलेक्शन मॅक्सच्या सर्वत्र स्टोअरमध्ये चाहत्यांसाठी खुले करण्यात आले आहे. यासाठी घेतलेल्या कोंटेस्ट मधील विजेत्यांना स्वप्निलचे हस्ताक्षर केलेले  ” लुक- बुक ” आणि त्याच्यासोबत सेल्फि काढण्याची संधी मिळाली. हिंदी आणि मराठी सिनेसृष्ठीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणा-या स्वप्नीलचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मिडीयावरुन तो आपल्या चाहत्यांशी नेहमीच कनेक्टेड असतो. त्याच्या हटके स्टाईलची क्रेज देखील तरुणांमध्ये जास्त असल्याकारणामुळे मॅक्स स्टोअरमध्ये होत असलेल्या स्वप्नील रेकमेड्स ला चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळेत यात शंका नाही. विशेष म्हणजे अशाप्रकारे चाहत्यांना आपले कलेक्शन उपलब्ध करून देणारा स्वप्नील पहिलाच मराठी अभिनेता ठरला आहे. हे कलेक्शन मुंबई, पुणे आणि  नागपूर मधल्या मॅक्सच्या स्टोअर्समध्ये उपलब्ध होणार आहे.

Exit mobile version