सनी लिओन बनली फेसबूक वर मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी

 

बॉलीवूड सेन्सेशन सनी लिओन फेसबूक वर मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या  चार्टच्या अनुसार, फेसबुक वर सनीला सर्वाधिक सर्च केले जात असल्याची बाब समोर आलीय.

बाकी बॉलीवूड सेलिब्रिटींना मागे टाकत सनी 100 गुणांसह सर्वाधिक चर्चिली गेलेली फेसबुक सेलिब्रिटी असल्याचं आढळून येते आहे. ‘सुई धागा’ फेम अनुष्का शर्मा 90 गुणांसह‘मोस्ट एंगेंजिंग फेसबुक सेलिब्रिटी’च्या ह्या यादीत दूस-या स्थानावर आहे. तर माधुरी दिक्षीत 86 गुणांसह तिस-या, प्रियंका चोप्रा 84 गुणांसह चौथ्या आणि जॅकलिन फर्नांडिस 83 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात की, “गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या करनजीत कौर ह्या वेबसीरिजीमूळे सनीची लोकप्रियता खूप वाढली होती. त्यातच तिचा रणविजयसोबत स्प्लिस्टविला सिझन 11 हा शो लाँच झाला. आणि मग तिची डिजीटल माध्यमांमध्ये लोकप्रियता खूप वाढली. ह्यामूळेच मग ती फेसबुक वर सर्वाधिक सर्च होऊ लागली. फेसबुकवर तिच्याविषयी पोस्ट आणि रिपोस्ट झाले.”

अश्वनी कौल बताते हैं, ” 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो”

Exit mobile version