शिवानी सुर्वेला MFKमध्ये दोन नामांकनं ‘पॉप्युलर फेस’ आणि ‘महाराष्ट्राची आवडती अभिनेत्री’

Shivani Surve Image

 

बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व ख-या अर्थाने गाजवले ते अभिनेत्री शिवानी सुर्वेने. बिग बॉसची फायनलिस्ट शिवानीची प्रचंड फॅनफॉलोविंग आहे. आणि त्यामुळेच तर महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री म्हणून शिवानीला नामांकन मिळाले आहे. ह्याशिवाय शिवानीला MFK (महाराष्टाची फेवरेट कोण) अवॉर्ड्समध्ये ट्रिपल सीट‘ सिनेमातल्या अभिनयासाठीही नामांकन मिळाले आहे. 

सुत्रांच्यानुसार, शिवानीला पहिल्यांदाच एमएफकेमध्ये नामांकन मिळत आहे. आणि एक नाही तर दोन-दोन विभागात हे नामांकन आहे. ही निश्चितच तिच्यासाठी  महत्वाची बाब म्हणायला हवी. पण शिवानीची सध्या महाराष्ट्रात असलेली फॅनफॉलोविंग पाहता, तिला ही नामांकन  मिळणं सहाजिक आहे.

‘पॉप्युलर फेस’ आणि ‘महाराष्ट्राची आवडती अभिनेत्री’ ह्या विभागात नामांकन मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना अभिनेत्री शिवानी सुर्वे म्हणली, ” मी यंदा  पहिल्यांदाच महाराष्ट्राचा फेवरेट कोण ह्या सोहळ्याला जाईन. आजवर ह्या सोहळ्याबद्दल ऐकलं होतं, आता पहिल्यांदाच हा दिमाखदार सोहळा पाहताही येईल. दोन-दोन नामांकन मिळण्याचीही माझी ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मी सध्या खूप उत्साहित आहे. आणि मला माझ्या चाहत्यांचे आभार मानायचे आहेत.  त्यांच्याच प्रेमामूळे मला नामांकनं मिळाली आहेत.”

Exit mobile version