शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रख्यात पत्रकार, खासदार संजय राऊत यांच्या ‘ठाकरे’ चित्रपटाच्या प्रमोशनल सॉंग रेकॉर्डिंगला आणली रंगत !

Uddhav Thackeray Marathi Movie

नम्र सुरवातीपासून चालत आलेला बाळासाहेब ठाकरेंचा जीवन प्रवास सामान्य लोकांचा असामान्य आवाज बनून जगभरात गरजला. बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास संजय राऊत यांनी जवळून अनुभवला आहे. म्हणूनच संजय राऊत लिखित आणि निर्मित ‘ठाकरे’ चित्रपटाचे प्रमोशनल सॉंग रेकॉर्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरलेला असून माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः रेकॉर्डिंग साठी उपस्थिती दर्शविली. संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि कार्निवल मोशन पिक्चर्स निर्मित ‘ठाकरे’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशनल सॉंग रेकॉर्डिंग नुकतेच यशराज स्टुडिओ, अंधेरी येथे पार पडले. ठाकरे चित्रपटाच्या प्रमोशनल सॉंगचे संगीत दिग्दर्शन मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या संगीत दिग्दर्शनाने राज्य गाजवणारी गोडजोळी रोहन- रोहन यांनी केले असून, पद्मश्री सुनील जोगी लिखित हे गाणे नकाश अझीझ यांच्या आवाजात संगीतबद्ध केले गेले आहे.

उद्धव ठाकरे म्हणतात की, “या गाण्यातून एक प्रकारची ऊर्जा मिळते. रोहन-रोहन यांनी इतकं उत्साहवर्धक गाणं बनविले आहे की, हे गाणं ऐकल्यावर  कोणीही त्याच्या चालीवर ताल धरल्याशिवाय राहणार नाही. पद्मश्री सुनील जोगी यांनी हे गाणं अतिशय प्रखर आणि अर्थपूर्ण लिहिले आहे. संजय राऊत यांनी या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली असून चित्रपटाला अप्रतिम रूप दिलेले आहे. पूर्वशी राऊत आणि विधिता राऊत या दोघींना मी माझ्या डोळ्यासमोर लहानाचं मोठं होत असताना पाहिले आहे आणि आता त्यांना खंबीर निर्मात्यांच्या भूमिकेत पाहताना मला फार आनंद होत आहे.”

संजय राऊत सांगतात की, “आज मी जे काही आहे ते बाळासाहेब ठाकरेंमुळे आहे. ‘ठाकरे’ हा चित्रपट म्हणजे जे जगातील सर्वात महान नेत्यांपैकी एक आहेत, त्यांच्यासाठी माझ्याकडून ही एक प्रकारची गुरुदक्षिणा आहे.”

Exit mobile version