‘व्हॅलेंटाईन डे’ला आलं पूर्वी भावेचं हॉट, सेन्शुअस, सेक्सी फोटोशूट

 

अभिनेत्री पूर्वी भावे आजवर तिच्या सोज्वळ आणि मराठमोळ्या लूकसाठी अनेकांना ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ वाटायची. पण पूर्वी भावे किती हॉट, सेक्सी, सल्ट्री, सेन्शुअस दिसू शकते, ते तिच्या सोशल मीडियावरून  नुकत्याच रिविल झालेल्या ग्लॅमरस फोटोशूटवरून दिसून येतंय.

रेड सेक्सी सॅटिन वनपिसमध्ये दिसत असलेल्या पूर्वी भावेचा हा मेकओवर खास ‘व्हॅलेटाईन डे’ निमीत्ताने झाला आहे का, असं विचारल्यावर पूर्वी भावे म्हणाली,“खरं तर, खूप दिवसांपासून काहीतरी नवीन लूक ट्राय करायची इच्छा होती. मग विचार केला की, ‘व्हॅलेटाईन्स डे’ हे निमीत्त चांगलं आहे. ‘व्हॅलेंटाईन्स डे’ची सुरूवात ‘लव्ह युवरसेल्फ’ने व्हायला हवी. म्हणून फोटोशूटची थीम सुध्दा रेडच ठेवली. थोडासा सेन्शुअस वाटणारा हा लूक क्लासी आणि एलिगंट सूध्दा दिसत असल्याने मला खूप आवडला.”

‘व्हॅलेंटाईन डे’ला झालेला पूर्वी भावेचा हा मेकओव्हर लक्षवेधक आहे. पूर्वी इंडियन आउटफिटमध्ये जेवढी सुंदर दिसते. तेवढीच ती वेस्टर्न आउफिटमध्ये ग्लॅमरस दिसू शकते, हे ह्या फोटोशूटने दाखवून दिलंय. पूर्वीच्या लूकवर तिचे चाहते आता नक्कीच फिदा होतील, हे वेगळं सांगायला नको.

Exit mobile version