‘संभळंग ढंभळंग’ आणि ‘चांदनी’ ह्या सुपरहिट गाण्यांनंतर टियाना प्रोडक्शन्स अजून एक धमाल गाणे घेऊन आले आहेत. हे गाणे रॉकस्टार रोहित राऊतने गायले आहे. ‘संभळंग ढंभळंग’ आणि ‘चांदनी’ ही गाणी सध्या परदेशातल्या रेडियो स्टेशन्सवर चालत आहेत. आणि आता रोहित राऊतने गायलेले ‘प्रीत तुझी’ गाणे लाँच होताच ह्या गाण्यालाही युट्यूब आणि सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
ह्या प्रतिसादाविषयी टियाना प्रॉडक्शन्सचे सुजीत जाधव म्हणतात, “संभळंग ढंभळंग आणि चांदनी सध्या अमेरिका, युरोप, कॅनडामधल्या रेडियो स्टेशनवर चालू आहे. आणि आता आमचं तिसरं गाणं रिलीज झाल्यावर त्याला मिळत असलेल्या उत्तम प्रतिसादाने आम्हांला आनंद होत आहे. सध्या तरूणाईमध्ये असलेल्या रोहितच्या लोकप्रियतेमूळे हे गाणं‘संभळंग’चे सगळे रेकॉर्ड तोडेल असा मला विश्वास आहे.”
संभळंग ढंभंळंग आणि चांदनी दिग्दर्शित केलेल्याच श्रावणी-आशिष जोडीने ‘प्रीत तुझी’ गाण्याचा व्हिडीयो दिग्दर्शित केलेला आहे. रोहित आपल्या गाण्याविषयी सांगतो, “टियाना प्रोडक्शन्सची नवी टिम आणि गणेश निगडे ह्या नव्या गीत-संगीतकारासोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. नव्या प्रतिभांसोबत काम करायला मला खूप आवडतं. एक वेगळ्या पध्दतीचे रोमँटिक गाणे गाण्याची इच्छा पूर्ण झाली. सध्या कानसेनांचाही खूप चांगला प्रतिसाद ह्या गाण्याला मिळतो आहे.”
Preet Tuzhi Song :