रीना बनली टॅक्सी ड्रायव्हर

आपल्या भारतीय संस्कृतीत ‘स्त्री’ या शब्दाला अनेक विरोधाभास आहे. एका ठिकाणी स्त्रीला देवीचे रूप मानले जाते तर दुसरीकडे तिलाच घरगड्यासारखे राबवले जाते. जग घडवणाऱ्या स्त्रीचे स्वतंत्र समाजाने आखून दिलेल्या कुंपणापर्यंतच मर्यादित असते. पण जेव्हा हेच कुंपण छेदून ती बाहेर येते, तेव्हाच खऱ्या अर्थाने क्रांती घडते. याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. क्रांतीचा हाच संदेश आणि हेच सूत्र घेऊन रीना अगरवाल प्रेक्षकांसमोर येत आहे.

एक सामान्य स्त्री विकास कसा घडवून आणू शकते याची एक छोटी पण प्रगल्भ विचार करायला लावणारी जाहिरात टीव्हीवर दिसून येत आहे. यात रीना एका टँक्सी-चालकाच्या भूमिकेत दिसत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सी चालवणारी ही ‘स्त्री’ पुढे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एका कार्यक्रमात जाऊन ५० लाख रुपये कमावते. अशी ही जाहिरात आहे. ही जाहिरात कोण बनेगा करोडपती या मराठी कथाबाह्य कार्यक्रमाची जरी असली, तरी स्त्रीविषयावर भाष्य करणारी ही जाहिरात समाजप्रबोधनाचे महत्वाचे काम करत आहे. ‘आजची स्त्री आधुनिकिकरणाच्या विश्वात राहत असल्याने, ती सर्वार्थाने सक्षम असायलाच हवी. आणि हाच संदेश या जाहिरातींमार्फत देण्यात येत असल्याचे रीना सांगते

Exit mobile version