युएन वुमन्सच्या सशक्त भारतीय महिलांच्या व्हिडीयोमध्ये सई ताम्हणकर !

स्त्री-पुरूष समानतेसाठी कार्यरत असलेल्या ‘युएन वुमन इंडिया’व्दारे मुली आणि महिलांना प्रेरणा देण्यासाठी मुझे हक है हा म्युझिक व्हिडीयो लाँच झाला आहे. ह्या व्हिडीयोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सशक्त महिलांना चित्रीत करण्यात आले आहे. ऐश्वर्या राय बच्चन, मिताली राज, सानिया मिर्झा, आशा भोसले, गौरी सावंत, डॉ. सईदा हमिद ह्या सशक्त महिलांसोबतच ह्या व्हिडीयोमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरलाही स्थान मिळालंय.

फिल्म इंडस्ट्रीतल्या सूत्रांनूसार, युएन वुमन्स ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी संस्था आहे. संस्थेच्या भारतीय शाखेतून भारतीय महिलांना आणि मुलींना प्रेरीत करणा-या व्हिडीयोमध्ये समाजातील वेगवेगळ्या स्तरातल्या नक्की कोणत्या महिलांना स्थान मिळावे, ह्यावर रिसर्च करण्यात आला. आणि त्यात सई ताम्हणकरची निवड करण्यात आली. ही नक्कीच एक महत्वाची गोष्ट आहे.

सूत्रांनूसार, सईने आपल्या करीयरच्या पंधरा वर्षांमध्ये फक्त मराठीच नाही तर भारतीय फिल्म इंडस्ट्रीवरही आपला ठसा उमटवलाय, हेच ह्यावरून सिध्द होते आहे.

Exit mobile version