मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे यांचा ‘ती & ती’ ;१ मार्चला होणार प्रदर्शित
दोन मुलींच्या मधोमध दिसणारा म्हणजेच ‘ती’ आणि ‘ती’च्या मध्ये अडकलेल्या पुष्कर जोगचा एक फोटो काही दिवसां अगोदर सोशल मिडीयावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत होता. त्या दोन मुली नेमक्या कोण आहेत याचा प्रेक्षकांना अंदाज बांधायला लावणारे पोस्टर पुष्कर जोगच्या ‘ती & ती’ या आगामी मराठी चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर होते. आणि आता त्या दोन मुली कोण या गोष्टीचा खुलासा करण्याची वेळ आली आहे.
आता ‘वेट इज ओव्हर’ असे म्हणत पुष्कर जोगच्या ‘ती & ती’ या चित्रपटाचे आणखी एक नवे कोरे पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रेक्षकांनी जो अंदाच बांधला तो योग्यच होता; या चित्रपटात पुष्कर जोगसोबत सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे या दोघी ‘ती’ आणि ‘ती’ ची भूमिका साकारणार आहेत हे आपण पोस्टरमधून कळते.
आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केले असून अभिनयासोबत पुष्करने या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. पुष्करसह, आनंद पंडीत, मोहन नादर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर मोहित छाब्रा हे सहनिर्माते आहेत.
अर्बन रोमँटिक कॉमेडी असलेल्या ‘ती & ती’ चे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्यामुळे पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांच्या ‘ती & ती’ मधून एका आगळ्या-वेगळ्या-इंटरेस्टिंग आणि मनोरंजक कथेसोबत प्रेक्षकांची लंडन सफारी पण होणार हे नक्की.
प्रेमाचा जेव्हा ट्रँगल बनतो तेव्हा सगळ्याच गोष्टीचे कन्फ्युजन वाढते. अशीच प्रेमात गोंधळ उडालेल्या तरुणाची कथा आणि भन्नाट लव्हस्टोरी असणारा ‘ती & ती’ चित्रपट १ मार्च २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. आणि मराठी चित्रपटाच्या बाबतीत घडलेली आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे ‘कार्निव्हल पिक्चर्स’ने इंटरनॅशनल थिएट्रीकल अधिकार प्राप्त केल्यामुळे ‘ती & ती’ प्रदर्शित तारखेला अथवा त्याच्या पुढील आठवड्यात परदेशातील चित्रपट रसिकांना पाहण्यासाठी प्रदर्शित केला जाईल.