माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून साकारलेला, अनिकेत राजकुमार बडोले (युगंधर क्रिएशन्स) निर्मित ‘दाह’ चित्रपटात किशोर चौघुले बनला ‘मामा’

किशोर चौघुले

मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील ‘किशोर चौघुले’ हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचले आहे. अनेक नाटकातील आणि चित्रपटातील अभिनयामुळे किशोर यांनी महाराष्ट्रातील जनतेला स्वत:शी आणि स्वत:च्या अभिनयाशी जोडून ठेवले आहे. मनात जे असेल ते थेट बोलणे असे व्यक्तिमत्व असणारे, जबरदस्त आवाजामुळे सर्वांचं लक्ष स्वत:कडे वेधून घेणारे किशोर चौघुले आता युगंधर क्रिएशन्स प्रस्तुत आणि अनिकेत राजकुमार बडोले निर्मित ‘दाह मर्मस्पर्शी कथा’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

मल्हार गणेश दिग्दर्शित आणि डॉ. सतिश (अतुल) सोनोने लिखित ‘दाह’ चित्रपटात किशोर यांनी कॉलेजचे शिपाई ‘मामा’ यांची भूमिका साकारली आहे. कॉलेजचे शिपाई मामा हे प्रत्येक विद्यार्थांचे खास असतात. पेशाने जरी ते शिपाई असले तरी एक वडीलधारी व्यक्ती आणि मित्र या नात्याने ते विद्यार्थांशी अगदी मनमोकळेपणाने संवाद साधतात. प्रेक्षकांना तर किशोर यांची ही भूमिका नक्कीच आवडेलच पण विद्यार्थांना देखील हे ‘मामा’ त्यांच्या कॉलेज जीवनात हवेहवेसे वाटतील यात शंका नाही.

माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून साकारलेला, अनिकेत राजकुमार बडोले (युगंधर क्रिएशन्स) निर्मित ‘दाह’ चित्रपटात सायली संजीव आणि गिरीश ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासह राधिका विद्यासागर, सुह्रद वार्डेकर, यतिन कार्येकर, उमा सरदेशमुख यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.

कौटुंबिक कथा असलेला ‘दाह- एक मर्मस्पर्शी कथा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version