तमाम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या ‘माऊली’ या आगामी चित्रपटाचे नवं गाणं लवकरच येत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याला ‘माझी पंढरीची माय’ ला महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला. अक्षय कुमारच्या हस्ते कार्तिकी एकादशीला लॉन्च झालेल्या या गाण्याने आजवर तब्बल आठ ते दहा मिलीयन व्ह्यूज मिळवले. भक्तिरसात नाहिल्यानंतर आता महाराष्ट्र रंगणार आहे तो होळीच्या रंगात!
लय भारी मधील आला होळीचा सण लय भारी हे गाणं सुद्धा प्रचंड गाजलं होतं, मात्र यंदा येणारं होळीचं गाणं, हे आणखीन रंगीत, आणखीन धमाकेदार आणि ऐकताक्षणी नाचायला लावणारं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गाण्यात महाराष्ट्राला हवहवसं असणारं एक मोठं सरप्राईज दडलं आहे. ते काय आहे, किंवा कोण आहे ते गाणं पाहिल्यावर तुम्हाला समजेलच!
झिंगाट, डॉल्बीवाल्या, ब्रिंग इट ऑन या गाण्यानंतर अजय अतुल पुन्हा एकदा हे धमाकेदार गाणे घेऊन येत आहेत. या गाण्याचे भन्नाट शब्द अजय गोगावले यांनी लिहिले असून तब्बल दीडशे ते दोनशे डान्सर्स सोबत हे गाणं हिंदीतल्या आघाडीचे कोरिओग्राफर बॉस्को सिजर यांनी कोरियोग्राफ केलं आहे.
जिओ स्टुडिओज हिंदुस्तान टॉकीज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित माऊली येत्या 14 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या सगळ्या चित्रपटगृहांमध्ये माऊली प्रदर्शित होत आहे. मात्र या गाण्याने डिसेंबरमध्येच सगळयांना रंग खेळण्याची इच्छा होणार हे मात्र नक्की!!
Riteish’s quote, “जिनीलिया सोबत काम करण्याची कोणतीही संधी मी सोडू शकत नाही, खरतर हे गाणं करण्याचा आग्रह मी त्यांना केला होता, त्यांच्या सोबत ४ वर्षा नंतर गाणं करण्याचा एक वेगळाच आनंद आहे आणि ते ही अजय अतुलच्या धमाकेदार चालीवर, आपेक्षा बाळगतो की तुम्हाला ही हे गाणं पाहायला तितकीच मजा येईल जितकी आम्हाला हे गाणं करताना आली.”