महाराष्ट्राला रोज पोट धरून हसायला लावणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ या सोनी मराठीवरील विनोदी कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या शोचे पहिले आणि दुसरे पर्व अत्यंत यशस्वी ठरले असून १०० एपिसोड्सचा टप्पाही पार झाला आहे.
म्हणूनच हे यश साजरे करण्याकरता, ५ मे – अर्थात ‘जागतीक हास्य दिनाचे’ औचित्य साधून सोनी मराठीकडून एक जंगी ‘सक्सेस पार्टी‘ आयोजित करण्यात आली होती. मराठी टीव्ही आणि चित्रपटविश्वातील तारकांच्या उपस्थितीने सजलेली ही पार्टी मुंबईमध्ये उत्साहात पार पडली. या पार्टीला प्रसाद ओक, प्राजक्ता माळी हे स्टार्स तसेच समीर चौगुले, विशाखा सुभेदार, अंशुमन विचारे, नम्रता संभेराव, अरुण कदम, पृथ्वीक कांबळे, सचिन मोते व सचिन गोस्वामी इ.
कलाकार मंडळींची उपस्थिती लाभली. सोनी मराठीचे सतत नवनव्या धाटणीचे व दर्जेदार कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सक्सेस पार्टीच्यानिमित्ताने विनोदातही आपण मागे नसल्याचेच सोनी मराठीने दाखवून दिले आहे.