भो भो पोहोचला दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात!!! : Bho Bho Marathi Movie

Bho Bho Marathi Movie

सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून महाराष्ट्राला वेड लावणारा ‘भो भो’, दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जाऊन पोहोचलाय. 5 ते 10 डिसेंबर 2015 दरम्यान रंगणाऱ्या या महोत्सवात भो भो ही स्पर्धा करणार आहे. सुमुखेश फिल्म्स प्रस्तुत आणि भरत गायकवाड निर्मित भो भो नव्या वर्षात आपल्या भेटीला येणार असला तरी फेसबुक, व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून भो भो घराघरात पोहोचलाय. भो भो आणि भोंडेंमधले विनोदी संवाद अवघ्या महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य खुलवण्यात यशस्वी होत आहेत. आणि यामुळेचं या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे.

भो भो आणि भोंडे यांची मुख्य भूमिका असलेला आगामी ‘भो भो’ हा सस्पेन्स थ्रिलर असला तरी विनोदी शैलीने मांडण्यात आला असल्याने तो नक्कीच प्रेक्षकांना खिळवून ठेवेल अशी आशा, चित्रपटाचे दिग्दर्शक भरत गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. लोकप्रिय हिंदी मालिकांच्या दिग्दर्शनाबरोबरचं धावा धाव या मराठी चित्रपट दिग्दर्शनानंतर भरत गायकवाड भो भोच्या निमित्ताने एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत.

भोंडे या खासगी गुप्तहेराच्या भूमिकेत प्रशांत दामलेंना आपण पाहू शकणार आहोत. यानिमित्ताने प्रशांत दामले मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. त्याशिवाय सुबोध भावे, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, सौरभ गोखले, संजय मोने, किशोर चौगुले आणि अनुजा साठे अशी नावाजलेली कलाकार मंडळी आपल्याला महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे.

तर भो भो प्रत्यक्षात आपल्या भेटीला येईपर्यंत फेसबुक आणि व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून त्याच्या संपर्कात राहूयात…

Exit mobile version