फेब्रुवारीमधील दर शनिवारी असणार ‘ती फुलराणी’चा एक तासाचा विशेष भाग
मंजू शौनकच्या नव्या नात्यातला गोडवा ताजा असतानाच अनेक संकटं त्यांच्यापुढे येऊन उभी ठाकली आहेत. घरच्यांचा विरोध पत्करून या दोघांनी लग्न केलं खरं पण देशमुख कुटुंबाने अजून मंजूलाघरची सून म्हणून स्विकारलेलं नाही. त्यात शौनककडून मिळालेल्या नकाराचा देवयानीला अजूनही त्रास होत आहे.
त्याला मिळवण्याच्या हव्यासापोटी मंजू-शौनकच्या संसारात देवयानीची लुडबूड सुरूआहे. त्यात इतर अनेक संकट एकामागोमाग एक मंजू-शौनकच्या पाठी पडली आहेत.
“अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर”, अशीच काहीशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या फुलराणीवर ओढवली आहे. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत मंजूआपलं शिक्षणाचं स्वप्न कसं काय पूर्ण करणार? यात तिला शौनक कशाप्रकारे साथ देणार? देशमुख कुटुंबाचा विरोध मावळणार का? या सगळ्याच प्रश्नांची सविस्तर उत्तरं मिळणार आहेत प्रेमाचा महिनासमजला जाणाऱ्या फेब्रुवारीमध्ये… फेब्रुवारीचे ९, १६, २३ या तीनही शनिवारी ‘ती फुलराणी’चा एक तासाचा विशेष भाग तुम्ही पाहू शकणार आहात.
या प्रेमा महिन्यात मंजू-शौनकचं प्रेम कितीसंबहरतं आणि त्यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या संकटांना ते कसे पार करतात जाणून घेण्यासाठी पाहत रहा, एक तासाचे हे विशेष भाग, तुमच्या लाडक्या सोनी मराठीवर.