पावसाने पुरवला ‘पोश्टर गर्ल’चा पिछ्छा

 

कोणताही चित्रपट चित्रित करायचा म्हटल्यावर बरीच आव्हाने पार करावी लागतात. यात सगळ्यात महत्त्वाची बाब असते ती म्हणजे…’चित्रपटाचे बजेट’…आणि जर अशा वेळी पाऊस आला तर…तर चित्रपटाचे तीन – तेरा वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचाच सामना करत ‘पोश्टर गर्ल’ सिनेमाचे चित्रिकरण पार पडले. चित्रिकरण सुरू झाल्यापासून संपेपर्यंत एकही दिवस हा पाऊस गैरहजर राहिला नव्हता. ‘वन-डे’ मॅचमध्ये जसे ओव्हर कमी असतात आणि धावा जास्त करायच्या असतात, तशी आमची परिस्थिती झाली होती, असे पोश्टर गर्ल सिनेमाचे दिग्दर्शक समीर पाटील म्हणाले.

आज जरी हा गमतीचा विषय वाटला तरी चित्रपट निर्मात्यांच्या डोक्यावर मात्र यादरम्यान टांगती तलवार होती. चित्रपटाला लाभलेल्या उत्तम कलाकारांमुळे पावसाच्या उपस्थितीतही काम चांगले झाल्याचे समाधान निर्माते पुष्पांक गावडे यांनी व्यक्त केले. बरीच आव्हाने पेलत पूर्ण झालेला ‘पोश्टर गर्ल’ हा चित्रपट येत्या 12 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Exit mobile version