‘डोण्ट वरी बी हॅप्पी’, व ‘कट्यार काळजात घुसली’ ने मारली बाजी

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कलागौरव पुरस्कार 
अर्चना नेवरेकर फाउंडेशन प्रस्तुत संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१६ हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा नुकताच गोरेगाव येथील नेस्को मैदानात दिमाखात पार पडला. यात ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकाने, तर ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाने बाजी मारली. दरम्यान, या सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संस्कृती कलादर्पणचा सर्वश्रेष्ठ कलागौरव या पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराने मी पुन्हा एकदा रसिकांच्या ओझ्याखाली दबलो गेलो असल्याचे अशोक सराफ यांनी सांगितले. ‘या पुरस्कारासाठी माझा विचार केल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ४५ वर्ष अभिनय कारकिर्दीमध्ये रसिकांनी मला अमाप प्रेम दिले. त्याबद्दल प्रेक्षकांचे मी आभार मानतो. या पुरस्कारामुळे मी ओझ्याखाली दबलो गेलो असून, आजही रसिक मायबाप मला पसंत करतात हे मी माझे भाग्य समजतो’ अशी भावना अशोक सराफ यांनी पुरस्कार घेताना व्यक्त केली.
संस्कृती कलादर्पण अध्यक्षा अर्चना नेवरेकर व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा गौरव करण्यात आला. यांसोबतच संस्कृती कलादर्पण सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलावंत मंडळी उपस्थित होती.  यंदा नाटक-चित्रपट आणि मालिका अशा तीन वेगवेगळ्या विभागात पुरस्कार देण्यात आले. त्यातील नाटक विभागात डोण्ट वरी बी हॅप्पी, चित्रपट विभागात कट्यार काळजात घुसली आणि मालिका विभागात ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेने सर्वोत्कृष्ट होण्याचा मान मिळवला. नाटक विभागातील सर्वोत्कृष्ट नेपथ्य, प्रकाश योजना आणि संगीत अशा तीन पुरस्कारांवर ‘तिन्ही सांज’ या संगीत नाट्याने आपले नाव कोरले. तसेच ऑल दी बेस्ट २, दोन स्पेशल, परफेक्ट मिस मेच आणी शेवग्याच्या शेंगा या नाटकांनी प्रत्येकी दोन पुरस्कारांवर मोहर उमटवली. शिवाय चित्रपट विभागात लोकांच्या पसंतीला उतरलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक, छायांकन, गीतरचना, पार्श्वगायक, संवाद, दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट अशा सर्वाधिक ९ पुरस्कारांवर आपले नाव कोरले. शिवाय मराठी चित्रपट सृष्टीतले अष्टपैलू अभिनेता सचिन पिळगावकर यांना ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी मानाचा मुजरा या विशेष पुरस्काराने नावाजले गेले. चित्रपट विभागातील विविध पुरस्कारांसाठी नटसम्राट या चित्रपटाला लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर कोतीला लक्षवेधी पुरस्कार प्राप्त झाला आहे, तसेच  ‘नटसम्राट’ मधील भूमिकेसाठी विक्रम गोखले यांस विशेष ज्युरी पुरस्कार तर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना अभिनय सम्राट हा पुरस्कार देण्यात आला.

मालिका विभागात तितिक्षा तावडे हिला सर्वोत्कृष्ट पदार्पण तर मृणाल दुसानीसला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तसेच वैभव चिंचाळकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.  शिवाय यंदाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सुप्रसिद्ध मराठी अभिनेता स्वप्नील जोशीला यावर्षीचा फेस ऑफ द इयर तर मानसी नाईकला स्टायल आयकॉन या पुरस्कारांनी नावाजण्यात आले.

संस्कृती कलादर्पण रजनी २०१६ नाट्य आणि चित्रपट पुरस्काराचे हे १६ वे वर्ष अनेक बाबींने विशेष ठरला. कलाकारांच्या कलागुणांचा गौरव तसेच मनोरंजन तथा मनोरंजन पलीकडे जाऊन कार्य करणा-या या पुरस्कार सोहळ्यात १ लाख ६१ हजार रुपयांचा धनादेश अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याकडे ‘नाम फाउंडेशन’ साठी देण्यात आला. तसेच यावर्षी वृत्तवाहिनी विभागात महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार जयंत पवार यांना पत्रकारितेचा पुरस्कार मिळाला असून, ए बी पी माझा या वृत्तवाहिनीला सर्वोत्कृष्ट वृत्तवाहिनीचा पुरस्कार बहाल करण्यात आला. तसेच आय.बी. एन. लोकमतचे अमोल परचुरे आणि नीलिमा कुलकर्णीला सर्वोत्कृष्ट सूत्रधार पुरस्काराने नावाजण्यात आले. गेली १६ वर्षे होत असलेल्या सोहळ्याचा थाट यंदाही कायम होता. कलावंतांच्या धमाल परफॉर्मन्समुळे सोहळ्याला चारचाँद लागले. अभिजीत खांडकेकरच्या सुत्रासंचालनात बहार आणण्यासाठी योगेश शिरसाट आणि प्राजक्ता हनमघर यांच्या खुमासदार विनोदांनी महत्वाची कामगिरी केली.
१६ वा संस्कृती कलादर्पण गौरव रजनी 
नाटक विभाग नामांकन 
सर्वोत्कृष्ट नेपथ्य नामांकन 
१. संदेश बेंद्रे – तिन्ही सांज
सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना नामांकन 
१. राजन ताम्हाणे –  तिन्ही सांज
 सर्वोत्कृष्ट रंगभूषा घोषित पुरस्कार 
 विक्रम गायकवाड (इंदिरा)
 सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत  नामांकन 
1. राहुल रानडे – परफेक्ट मिसमॅच
 सर्वोत्कृष्ट संगीत  नामांकन
१. परिक्षित भातखंडे – तिन्ही सांज
सर्वोत्कृष्ट लेखक नामांकन 
1. गजेंद्र अहिरे
(शेवग्याच्या शेंगा )
सर्वोत्कृष्ट  बालकलाकार घोषित 
  अथर्व बेडेकर
(सोबतीने चालताना )
सर्वोत्कृष्ट  सहाय्यक अभिनेत्री  नामांकन 
१. ऋतुजा देशमुख – सेल्फी
 
सर्वोत्कृष्ट  सहाय्यक अभिनेता नामांकन 
1. अभिजित पवार
( ऑल दी बेस्ट-२ )
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता / अभिनेत्री नामांकन 
१. मयुरेश पेम – ऑल दी बेस्ट-२
२. समीर चौगुले – श्री बाई समर्थ
विशेष ज्युरी पुरस्कार घोषित 
१. अभिनेता – किरण माने – परफेक्ट मिसमॅच
२. अभिनेत्री – उषा नाडकर्णी – लंडनच्या आजी बाई
लक्षवेधी अभिनेत्री नामांकन 
१. निर्मिती सावंत – श्री बाई समर्थ
2. सुप्रिया विनोद – इंदिरा
लक्षवेधी अभिनेता नामांकन 
1. संजय मोने – शेवग्याच्या शेंगा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकन 
१. गिरीजा ओंक – दोन स्पेशल
सर्वोत्कृष्ट अभिनेता नामांकन 
१. उमेश कामत – डोन्ट वरी बी हॅप्पी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नामांकन 
३. क्षितिज पटवर्धन – दोन स्पेशल
सर्वोत्कृष्ट नाटक २०१६ नामांकन 
1. डोन्ट वरी बी हॅप्पी – सोनल प्रॉडक्शन
चित्रपट विभाग 
सर्वोकृष्ट कला दिग्दर्शक नामांकन 
१. संतोष फुटाणे – कट्यार काळजात घुसली.
सर्वोकृष्ट  संकलन नामांकन
1. चारुश्री रॉय – डबलसीट
सर्वोकृष्ट  छायांकन नामांकन 
१. सुधीर पलसाने – कट्यार काळजात घुसली
सर्वोकृष्ट रंगभूषा नामांकन
1. महेश बराटे – देऊळबंद
सर्वोकृष्ट संगीत नामांकन 
1. अमितराज सावंत – मितवा
2. अवधूत गुप्ते – एक तारा
सर्वोकृष्ट गीतरचना नामांकन 
१. सुर निरागस हो – मंगेश कांगणे  – कट्यार काळजात घुसली
 सर्वोकृष्ट पार्श्वगायिका नामांकन 
१. सावर रे – जान्हवी प्रभू – अरोरा – मितवा
 सर्वोकृष्ट पार्श्वगायक नामांकन 
१. सुर निरागस – शंकर महादेवन – कट्यार काळजात घुसली
२. सुरत पिया की – राहुल देशपांडे-महेश काळे – कट्यार काळजात घुसली
 सर्वोकृष्ट संवाद नामांकन 
१. प्रकाश कापडिया – कट्यार काळजात घुसली
2. किरण यज्ञोपवीत- अभिजित देश्पांडे – नटसम्राट
 सर्वोकृष्ट पटकथा नामांकन
१. अतुल काळे, आशिष रायकर, सुबोध खानोलकर- संदुक
२. प्रविण तरडे – देऊळबंद
३. भरत गायकवाड, जयंत बार्डोलोय – भो- भो
४. भाऊराव कऱ्हाडे- ख्वाडा
५. प्रकाश कापडिया – कट्यार काळजात घुसली
सर्वोकृष्ट कथा नामांकन
१. प्रविण तरडे – देऊळ बंद
सर्वोकृष्ट बालकलाकार नामांकन
१. अज्ञेश मुंडशिंगकर – कोती
2. दिव्येश मेदगे – कोती
सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता नामांकन
१. संदीप पाठक – रंगा पतंगा
२. शशांक शेंडे – ख्वाडा
 सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्री नामांकन
१. प्रार्थना बेहेरे – मितवा
लक्षवेधी अभिनेता नामांकन
1. संजय कुलकर्णी – कोती
प्रथम पदार्पण अभिनय नामांकन 
१. गश्मीर महाजनी – देऊळबंद
सर्वोकृष्ट अभिनेता  नामांकन 
१. सुमित राघवन – संदुक
२. अंकुश चौधरी – डबलसीट
सर्वोकृष्ट अभिनेत्री नामांकन
1. मेधा मांजरेकर – नटसम्राट.
प्रथम पदार्पण दिग्दर्शन नामांकन 
१. प्रसाद नामजोशी – रंगा पतंगा
2. भाऊराव कऱ्हाडे- ख्वाडा
लक्षवेधी चित्रपट घोषित 
कोती – ओम्स आर्ट्स
 
सामाजिक चित्रपट नामांकन 
३. देऊळबंद – वटवृक्ष एंटरटेनमेंट प्रा. लि.
लोकप्रिय चित्रपट नामांकन 
2. नटसम्राट – फिनक्राफ्ट मिडिया आणि गजानन चित्र
फेस ऑफ द ईयर २०१६ घोषित 
स्वप्निल जोशी
स्टाईल आयकॉन २०१६ घोषित
मानसी नाईक २०१६
विशेष पुरस्कार घोषित 
१. अभिनय सम्राट पुरस्कार – नाना पाटेकर- नटसम्राट
२. विशेष ज्युरी पुरस्कार – विक्रम गोखले-  नटसम्राट
मानाचा मुजरा २०१६
सचिन पिळगावकर – कट्यार काळजात घुसली
सर्वोकृष्ट चित्रपट २०१६ नामांकन 
1.. कट्यार काळजात घुसली – श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मस
मालिका विभाग नामांकन 
सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्री नामांकन
2. अश्विनी एकबोटे – दुर्वा – स्टार प्रवाह
 सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता नामांकन
१. संग्राम साळवी – सरस्वती- कलर्स मराठी
2. माधव देवचक्के – सरस्वती – कलर्स मराठी
प्रथम पदार्पण अभिनेत्री 
तितिक्षा तावडे  – सरस्वती – कलर्स मराठी
सर्वोकृष्ट कथाबाह्य कार्यक्रम – घोषित 
कॉमेडीची बुलेट ट्रेन – कलर्स मराठी
सर्वोकृष्ट अभिनेता नामांकन 
1. संतोष जुवेकर – अस्स सासर सुरेख बाई – कलर्स मराठी
सर्वोकृष्ट अभिनेत्री नामांकन
1.. मृणाल दुसानिस –  अस्स सासर सुरेख बाई – कलर्स मराठी
सर्वोकृष्ट दिग्दर्शक नामांकन
१. वैभव चिंचाळकर – चीत्रकथी – दूरदर्शन
लक्षवेधी मालिका नामांकन 
1.  गणपती बाप्पा मोरया- कलर्स मराठी
2. अरे वेड्या मना – स्टार प्रवाह
सर्वोकृष्ट मालिका नामांकन 
1. अस्स सासर सुरेख बाई – सेवेन्थ सेन्स मिडिया-  कलर्स मराठी
विशेष ज्युरी पुरस्कार – पाषाणपती – दूरदर्शन
वृत्तवाहिनी विभाग नामांकन 
सर्वोकृष्ट सूत्रधार पुरुष नामांकन
1. अमोल परचुरे – आय. बी. एन. लोकमत
सर्वोकृष्ट सूत्रधार स्त्री नामांकन
२. नीलिमा कुलकर्णी – आय. बी. एन. लोकमत
सर्वोकृष्ट कथाबाह्य नामांकन 
१. ढँण टॅ  ढँण – एबीपी माझा
सर्वोकृष्ट न्यूज चॅनल नामांकन 
३. एबीपी माझा
पत्रकारिता पुरस्कार घोषित 
जयंत पवार
महाराष्ट्र टाईम्स
 
पत्रकारिता घोषित पुरस्कार 
सर्वोकृष्ट पी. आर . 
अमृता माने
औदुंबर एंन्टरटेनमेंन्टस
Exit mobile version