‘जागो मोहन प्यारे’चा ‘राहुल’ भेटला बॉलीवुडच्या ‘राहुल’ला

Prithvik with SRK

अभिनेता शाहरूख खानने आपल्या 9 बॉलीवूड सिनेमांमध्ये राहुलची भूमिका रंगवलीय. डर, जमाना-दिवाना, येस बॉस, दिल तो पागल हैं, कुछ कुछ होता हैं, हर दिल जो प्यार करेगा, कभी खुशी कभी गम, चैन्नई एक्सप्रेस आणि फॅन ह्या सिनेमांमधल्या राहुलला किंगखानचे चाहते विसरूच शकत नाहीत. किंबहुना राहुल ह्या नावाला ग्लॅमर लाभलं ते बॉलीवूडच्या ह्या बादशाहमुळेच.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दुस-या पर्वाचा विजेता अभिनेता पृथ्वीक प्रतापनेही ‘जागो मोहन प्यारे’ ह्या मालिकेत राहुलची भूमिका रंगवली होती.  ह्या मराठी मालिकेतल्या राहुलला नुकतीच बॉलीवुडचा बादशाह असलेल्या राहुलला भेटायची संधी मिळाली.  पृथ्वीकने ही फॅनमोमेंट कॅमे-यात कॅप्चर केली आहे. आणि  आपला शाहरूख खानसोबतचा फोटो सोशल मीडियावर टाकला आहे.

हा फोटो टाकताना पृथ्वीकने म्हटलंय, “आज मै जो कुछ भी हु.. बस आप के वजह से हु! लाइफ रिस्क पे लगादी आप से मिलने के लिये. अ ड्रीम कमिंग ट्रू”

ह्या भेटीविषयी पृथ्वीक प्रतापला विचारल्यावर तो म्हणाला, “ शाहरूख खानचा एक डायलॉग आहे, ‘इतनी शिद्दत से मैने तुम्हे पाने की कोशीश की हैं’  …. माझ्याबाबतीत अगदी तेच घडलंय. सिनेसृष्टीत काम करणा-या प्रत्येक अभिनेत्याची इच्छा असते. की बॉलीवूडच्या ह्या किंगला एकदा तरी भेटावं. ती इच्छा पूर्ण होणं, हे स्वप्नवत होतं.”

ही भेट कशी झाली? येत्या काळात शाहरूखसोबत काही प्रोजेक्ट होणार आहे का? असं विचारल्यावर पृथ्वीक म्हणतो, “शाहरूख खानसोबत काम करायला कुणाला नाही आवडणार. पण ह्याविषयीचा खुलासा मी लवकरच करीन. सध्या ह्याविषयी जास्त बोलणं शक्य नाही.”

Exit mobile version