कॉर्पोरेट विश्वाचे प्रतिरूप… मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड

Mr. & Mrs. Unwanted

पैसा आणि प्रसिध्दी यांचं मिश्रण म्हणजे कॉर्पोरेट विश्व… या विश्वात दाखवली जाणारी मोठमोठी स्वप्नं आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून त्यामागे धावणारी तरूणाई… हे चित्र आज आपल्या समाजापुढे उभे राहिले आहे. ही एक मोठी समस्या आज तरूणांना सतावत आहे. अशाच काही समस्यांवर मराठी सिनेसृष्टी नेहमीच प्रकाश टाकत असते. आजच्या पिढीसमोर उभी ठाकलेली ही समस्या दिग्दर्शक दिनेश अनंत यांनी आपल्या मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड या चित्रपटात मांडलेली आहे.

 “आज कित्येक तरूण या कॉर्पोरेट क्षेत्राकडे आकर्षित होताना आपल्याला दिसतात. या क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक तरूणाच्या समस्यांवर हा चित्रपट भाष्य करतोया विश्वात जगताना नकळत हे तरूण कधी निसर्गाच्या विरोधात जातात आणि निसर्ग त्यांना प्रत्युत्तर देतो. हे उत्तर कितीही कटू असले तरी त्यातून मार्ग काढण्याचा सकारात्मक दृष्टीकोन हा चित्रपट देत असल्याचे दिग्दर्शक दिनेश अनंत म्हणतात.

दोन पात्रांभोवती फिरणाऱ्या या कथेत कॉर्पोरेट विश्वात वावरणाऱ्या तरूण जोडप्याची कथा मांडलेली आहे. पप्पी दे पारूला फेम स्मिता गोंदकर आणि क्राईम पेट्रोल फेम राजेंद्र शिसतकर या जोडप्याच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. उर्वी एंटरप्रायजेस यांची निर्मिती असणारा हा चित्रपट पाहताना आजचा तरूण या चित्रपटात स्वत:ला पाहू शकेल, असा विश्वास निर्माते मितांग भूपेंद्र रावल यांनी दर्शवला आहे. तर असा हा तरूण पिढीचा मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड येत्या 23 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Exit mobile version