‘इपितर’ चित्रपटाचे फस्ट लूक पोस्टर झाले लाँच

इपितर

साधी माणसं, ग्रामीण बाजाची भाषा आणि सशक्त कथानक हा चांगल्या मराठी सिनेमाचा गाभा मानला जातो. आणि असाचं एक सिनेमा जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचं नाव आहे इपितर. इपितर सिनेमाचं फस्ट लूक पोस्टर नुकतंच लाँच झालं आहे.

 डॉ. सोनाली पाटील रॉय आणि डॉ. संदिप सत्यदेव रॉय प्रस्तुत इपितर सिनेमाची निर्मिती नितिन कोल्हापूरे आणि किरण बेरड ह्यांनी केली आहे.  ह्या विनोदी सिनेमात भारत गणेशपुरे ,मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे ,जयेश चव्हाण ,विजय गीते ,गणेश खाडे ,निकिता सुखदेव, वृंदा बाळ ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत.

चित्रपटाचे निर्माते आणि लेखक किरण बेरड सिनेमाविषयी सांगतात, “इपितर हा टिपीकल गावाकडला शब्द आहे. इरसाल, बिलंदर ह्या अर्थाने त्याचा वापर केला जातो. अशाच तीन इरसाल मुलांची कथा तुम्हांला इपितर सिनेमातून दिसणार आहे. विनोदी ढंगाने जाताना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्नही आम्ही केलेला आहे.”

डॉ. सोनाली पाटील रॉय आणि डॉ. संदिप सत्यदेव रॉय प्रस्तुत, नितिन कोल्हापूरे आणि किरण बेरड निर्मित आणि दत्ता तारडे दिग्दर्शित इपितर 8 जून 2018 ला रिलीज होणार आहे.

Exit mobile version