Marathi News

‘इन निक ऑफ टाइम’ मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप ट्रेंडिंग एक्ट्रेस

 

काही दिवसांपूर्वी मायदेशी परतलेल्या आंतरराष्ट्रीय आयकॉन प्रियंका चोप्राच्या पूढील बॉलीवूड प्रोजक्टविषयी मीडियामध्ये उत्सुकता होती. प्रियंका पहिल्यांदा शोनाली बोसचं प्रोजेक्ट सुरू करणार की सलमानचं इथंपासून ते तिचं सलमानची फिल्म भारत सोडणं आणि तिच्या निक जोनाससोबतच्या साखरपुड्याच्या बातम्यांपर्यंत प्रियंका सतत चर्चेत होती. त्यामूळेच तर प्रियंका बॉलीवूडची सध्याची टॉप ट्रेंडिंग अभिनेत्री बनलेली आहे.

सलमानची फिल्म भारतचे दिग्दर्शक अली अब्बास जफरने सोशल मीडियावर प्रियंका भारत चित्रपट सोडत असल्याची घोषणा करतानाच ‘इन निक ऑफ टाइम’ चा सूचक उल्लेख केला होता. त्यामूळे प्रियंका चर्चेत आली होती 94 गुणांसह स्कोर ट्रेन्ड्स इंडिया चार्टवर अग्रस्थानी असलेली प्रियंका चोप्रा देशातली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनलेली आहे.

स्कोर ट्रेंड्सचे सह संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “आपल्या वाढदिवसाच्या सुमारास भारतात परतलेली प्रियंका निक जोनाससोबत गोव्यात फिरायला गेली होती त्यानंतर प्रियंकाने शोनालीची फिल्म आणि सलमानसोबत भारत हा सिनेमा करायचा निर्णय घेतला. ह्यामूळे अर्थातच ती सतत बातम्यांच्या मथळ्यांमध्ये आणि सोशलमीडियामध्ये चर्चेत राहिली. आता तर ‘भारत’ सोडल्यावर आणि तिच्या साखरपुड्याच्या बातम्यांमूळे ती सतत ट्रेंड होत आहे. त्यामूळेच अचानक टॉप ट्रेडिंग अभिनेत्री बनलेली प्रियंका लोकप्रियतेत बॉलीवूडची नंबर वन अभिनेत्री झालीय. “

अश्वनी कौल पूढे म्हणतात, ” 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button