अमृता बनली “शो अँकर” 

मराठीतील सिनेसृष्टीत सौंदर्याची खाण असणा-या अनेक मराठमोळ्या हिरॉइन्स हिंदीतही आपलं नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे त्यांना यश देखील मिळत आहे. या  हिरॉइन्सच्या  मांदियाळीत अमृता खानविलकरचे नाव आवर्जून घेतले जाते. मराठी सिनेसृष्टीतल्या या नायिकेने आपल्या अदाकारीने हिंदी सिनेसृष्टीलाही नाचवले आहे. ‘नच बलिये -७’ पर्वाच्या यशाने अमृताने हिंदी सृष्टीत मराठीचा झेंडा रोवला. सध्या चर्चेत असलेल्या “बाजीराव मस्तानी” या सिनेमाचा एक कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाचा उल्लेख यासाठी करावासा वाटतोय, कारण या  कार्यक्रमाची शो अँकर अमृता खानविलकर होती. रणवीर, प्रियांका, दीपिका या त्रिकुटाला घेऊन संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव मस्तानी हा सिनेमा बनवला आहे. मराठ्यांचा पेशवेकाळ या सिनेमात साकारला आहे.मुळातच हा सिनेमा मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा असल्याने या कार्यक्रमाची थीमही मराठमोळी होती. त्यामुळे  या सिनेमाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याऱ्या अमृतानेही  मराठी संस्कृतीला शोभेल असा पेहराव केला होता. या कार्यक्रमात अमृताने रणवीर आणि प्रियांका  यांच्यासोबत खूप धमाल केली. या कार्यक्रमाची रंगत वाढविताना तिने रणवीरच्या मल्हारी तर प्रियांकाच्या पिंगा या गाण्यावर त्यांच्यासोबत काही स्टेप्सही केल्या.  ” या कार्यक्रमाची शो अँकर म्हणून माझी निवड  केल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. मी रणवीरची खूप मोठी फॅन असून या अगोदरही आम्ही एकमेकांना भेटलो आहोत. रणवीर एक चांगला व्यक्ती असून समोरच्या व्यक्तीसोबत कम्फर्ट झोन बनवतो आणि त्यामुळेच कदाचित मी त्याच्याशी चागलं  इंटऱॅक्ट करू शकले.” असा या कार्यक्रमाचा अनुभव अमृताने सांगितला

Exit mobile version