बॉलीवुड सुपरस्टार अक्षय कुमारचा नुकताच वाढदिवस होता. वाढदिवशी आपल्या कुटूबियांकडून आणि चाहत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंशिवाय अक्षय कुमारला अजून एक बर्थ-डे गिप्ट मिळाले आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टच्या अनुसार, न्यूज़प्रिंटमध्ये सर्वाधिक चर्चिला गेलेला आणि लोकप्रिय असलेला सेलिब्रिटी खिलाडी कुमार ठरला आहे.
आपल्या गोल्ड सिनेमाच्या रिलीजच्यावेळी अक्षय कुमार 14 भारतीय भाषामधल्या मुख्य 125 वर्तमानपत्रांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिला. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.
ह्या आकडेवारीनूसरा, अक्षय 87 गुणांसह न्यूजप्रिंट श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकावर राहिला. तर अमिताभ बच्चन 82 गुणांसह दूस-या स्थानावर आणि सलमान खान 71गुणांसह तिस-या स्थानावर राहिले. अभिनेता ऋषि कपूर चौथ्या स्थानी तर युवापिढीचा लाडका वरुण धवन पाचव्या स्थानी होता.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “अक्षयच्या गोल्ड सिनेमाच्या रिलीजनंतरही अक्षय आपल्या सामाजिक कार्यामूळे सतत चर्चेत होता. वर्तमानपत्रात त्याच्या फॅमिली हॉलिडेपासून ते सिनेमांच्या रिलीज आणि आणि फिटनेसबद्दल जे काही लिहून आले त्यामूळे तो सर्वाधिक चर्चिला गेलेला बॉलीवूड स्टार ठरला.”
अश्वनी कौल पूढे म्हणतात, “14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”